गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसावर कारवाई, ऐवज जप्त
बीड प्रतिनिधी :- गोदावरी नदी पात्रात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाने वाळू माफियांवर कारवाई केली असून, सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या काही दिवसापासून गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. आजही त्याच पद्धतीने नदी पात्रातील हिंगणी शिवारात अवैधरित्या वाळू माफियांकडून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार तात्काळ बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाने गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई केली असून 6 ट्रॅक्टर, 7 केन्या, 4 दुचाकी, 300 ब्रास वाळू असा एक ते दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चार आरोपी ताब्यात घेतले असून गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गणेश मुंडे, विष्णू वायबसे, स्वाती मुंडे व पथकातील टीमने केली.
What's Your Reaction?