लिंबागणेश येथील मतदान केंद्राचा अपर पोलीस अधीक्षकांनी आढावा घेतला

लिंबागणेश येथील मतदान केंद्राचा अपर पोलीस अधीक्षकांनी आढावा घेतला

बीड प्रतिनिधी:-  तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील फेविस्टीक प्रकरणामुळे संवेदनशील असलेल्या मतदान केंद्राचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दि.१ सोमवार रोजी अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी पोलिस पथकासमवेत आढावा घेतला.यावेळी नेकनुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे ,लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे.संतोष राऊत, नवनाथ मुंढे आदि उपस्थित होते.

     दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशिन मध्ये फेविस्टीक टाकल्याचा प्रकार घडला होता.संबधित प्रकरणी केंद्र प्रमुखांच्या फिर्यादीवरून नेकनुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यामुळे दि.२३ डिसेंबर रोजी फेरमतदान घेण्यात आले होते. मुख्याध्यापक आबासाहेब हांगे यांच्याशी संवाद साधत मतदान केंद्राचा आढावा घेतल्यानंतर गावातील प्रमुखांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. निवडणुक आयोगाने कठोर धोरण अवलंबिले असुन लोकशाहीला घातक प्रकार घडता कामा नयेत यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी सरपंच बालासाहेब जाधव,ग्रां.स. दामु थोरात,समीर शेख,जिवन मुळे, सुखदेव वाणी, विक्रांत वाणी, औदुंबर नाईकवाडे न,सय्यद ताहेर, पत्रकार हरिओम क्षीरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow