‘माझ्या पराभवानंतर 2 डझन आमदार-खासदार झाले, पण मी पात्र नाही - पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी ilovebeed च्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.

‘माझ्या पराभवानंतर 2 डझन आमदार-खासदार झाले, पण मी पात्र नाही - पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. पंकजा यांनी नुकतंच दिल्लीत केलेल्या भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा झालेली. त्यानंतर त्यांनी आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर राज्यात विधान परिषद, राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुका पार पडल्या. पण त्यामध्ये पंकजा यांना संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीवेळी पंकजा यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अखेर पंकजा यांच्या संयमाचा बांध आज फुटला. त्यांनी आज धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी आपण भापन नेते अमित शाह यांना भेटणार असल्याचं सांगितलं.

‘अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत, पण…’
“माझ्या माध्यमातील हितचिंतकांनो आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनो, मला जर भूमिका घ्यायची असेल तर पंकजा मुंडे अशीच तुम्हाला बोलवेल आणि तुमच्यासमोर भूमिका जाहीर करेल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून बंदूक चालणारे खांदे अजून मला मिळालेले नाही. मात्र, माझ्या खांद्याची रुंदी एवढी मोठी आहे की, अनेक बंदूका माझ्या खांद्यावर विसावायचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना विसावू देणार नाही”, असं पंकजा म्हणाल्या.

‘4 वर्षात 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर’
“पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिकांशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोकं निवडणुका हरले, पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात कदाचित 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. कारण माझ्या मनात दाट विश्वास आहे”, असं पंकजा म्हणाल्या.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow