तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर माकडांची प्रतिकृती बसवण्यात आली
एस.एम.युसूफ़, डाॅ.तांदळे, डाॅ.ढवळे यांच्या लढ्यास यश
बीड ( प्रतिनिधी ) : बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो या महात्मा गांधीजींचा संदेश देणाऱ्या तीन माकडांच्या प्रतिकृती तीन आंदोलन व तीन वर्षांच्या संघर्षानंतर आज दिनांक २ ऑक्टोबर २०२३ सोमवार रोजी महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्ताने बीड नगर परिषद कडून बसविण्यात आल्या. तीन वर्षांपूर्वी तोडफोड करण्यात आलेल्या या प्रतिकृती बसविण्यात याव्या म्हणून सातत्याने आंदोलन करून बीड नगर परिषदसह जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे यांच्या सामूहिक लढ्यास एकदाचे यश आले. यामुळे या तिन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना जिल्हा कारागृह मागील माने कॉम्प्लेक्स समोर असलेल्या या प्रतिकृतीच्या चौकात बोलावून त्यांना पुष्पगुच्छ व वडाच्या झाडाचे रोपटे देत आभार व्यक्त केले. तसेच तिन्ही माकडांच्या प्रतिकृतींना पुष्पहार घालण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे, सादिक भाई, आजम खान, रामधन जमाले, मनीषा मुंडे, मनीषा खाडे, सुदामराव कोळेकर, रमाकांत मुळे, संजय नवले यांच्यासह अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?