अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून आनंदाची बातमी !
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटयांची ३०/६/२०१६ च्या पुर्वी थकबाकीदार सभासदांकरीता जिल्हा बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंमलात आणली असून या योजनेचा थकबाकीदार शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन मा. मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केले. जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटयांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत ते नगर येथे बोलत होते. पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा व सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार सभासदांनी त्यांचे अर्ज ३१/१२/२०२३ पूर्वी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीत व शाखेत सादर करावेत. लाभ घेणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा बँक त्वरीत नियमित पिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे सदर शेतकरी नियमित कर्जदार होत असल्याने सदर कर्जदारांना ३ लाख रुपयांपर्यंतच्या पिक कर्जावर शुन्य टक्के व्याज दराचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. पिक कर्ज अथवा इतर कर्ज नियमित परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना मोठा भुरदंड बसतो. थकीत पिक कर्जाला ११% च्यावर व्याजदर आकारणी होत असते. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केले. याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसाठी विविध व्यवसायांकरीता राबवणाऱ्या योजनांची माहीती देवून सोसायट्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता या योजनेत सहभागी होण्याबाबत सांगीतले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आपल्या प्रास्ताविकात वसुली, ठेवी वाढीबाबत मार्गदर्शन केले व सेवा सोसायटीने केंद्रशासीत संगणकीकरण योजनेत अग्रेसिव्ह काम करून आपल्या सेवा सोसायट्या लवकरात लवकर केंद्रशासीत संगणकीकरण योजनेत संस्था संगणकीकरण करून घेण्याबाबत सुचना केल्या. याप्रसंगी बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, सिताराम पाटील गायकर, माजी आ. राहुल जगताप, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, करण ससाणे, देवीदास घोडेचोर, बँकेचे अधिकारी तसेच तालुका विकास अधिकारी, जिल्हयातील सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन बँकेचे सरव्यवस्थापक जयंत देशमुख यांनी मानले.
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटयांची ३०/६/२०१६ च्या पुर्वी थकबाकीदार सभासदांकरीता जिल्हा बँकेने एकरकमी कर्ज परतफेड योजना २०२३ अंमलात आणली असून या योजनेचा थकबाकीदार शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन मा. मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
जिल्हयातील विविध कार्यकारी सेवा सोसायटयांच्या सचिवांच्या आढावा बैठकीत ते नगर येथे बोलत होते. पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा व सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार सभासदांनी त्यांचे अर्ज ३१/१२/२०२३ पूर्वी आपल्या विविध कार्यकारी सोसायटीत व शाखेत सादर करावेत.
लाभ घेणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांना जिल्हा बँक त्वरीत नियमित पिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे सदर शेतकरी नियमित कर्जदार होत असल्याने सदर कर्जदारांना ३ लाख रुपयांपर्यंतच्या पिक कर्जावर शुन्य टक्के व्याज दराचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.
पिक कर्ज अथवा इतर कर्ज नियमित परतफेड न केल्यास शेतकऱ्यांना मोठा भुरदंड बसतो. थकीत पिक कर्जाला ११% च्यावर व्याजदर आकारणी होत असते. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्ज वेळेत भरण्याचे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केंद्र सरकारच्या विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसाठी विविध व्यवसायांकरीता राबवणाऱ्या योजनांची माहीती देवून सोसायट्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्याकरीता या योजनेत सहभागी होण्याबाबत सांगीतले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी आपल्या प्रास्ताविकात वसुली, ठेवी वाढीबाबत मार्गदर्शन केले व सेवा सोसायटीने केंद्रशासीत संगणकीकरण योजनेत अग्रेसिव्ह काम करून आपल्या सेवा सोसायट्या लवकरात लवकर केंद्रशासीत संगणकीकरण योजनेत संस्था संगणकीकरण करून घेण्याबाबत सुचना केल्या.
याप्रसंगी बँकेचे संचालक माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, सिताराम पाटील गायकर, माजी आ. राहुल जगताप, अंबादास पिसाळ, अमोल राळेभात, करण ससाणे, देवीदास घोडेचोर, बँकेचे अधिकारी तसेच तालुका विकास अधिकारी, जिल्हयातील सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन बँकेचे सरव्यवस्थापक जयंत देशमुख यांनी मानले.
What's Your Reaction?