अपंग ऊसतोड कामगारास मातृभूमी प्रतिष्ठानकडून मदत

अपंग ऊसतोड कामगारास मातृभूमी प्रतिष्ठानकडून मदत

बीड प्रतिनिधी: एका पायाने अधू असलेला ऊसतोड कामगार हप्पा पवार यास मातृभूमी प्रतिष्ठानकडून आर्थिक मदतीचा हात पाटोदा( प्रतिनिधी ) महा सांगवी शिवारात सध्या धुळे जिल्ह्यातील अजनाळे गावचे एका पायाने अधू असलेले ऊसतोड कामगार हप्पा पवार वय वर्ष 50 हे मागील वीस वर्षापासून ट्रकचे चाक पायावरून गेल्याने एक पाय निकामी झाला असताना दुसऱ्या पायावर सलग वीस वर्षापासून ऊस तोडणी चालू आहे. सध्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी शिवारात ऊस तोडणी चालू असून पारधी कुटुंबातील हप्पा पवार पत्नी एक मुलगा दोन मुली असे पाच जणांच्या कुटुंबासह ऊस तोडणी करून कष्ट करत आहेत .सध्या गावाकडे देखील वस्तीवर एका कुडात राहत असून, कोणत्याही शासकीय योजना अद्याप पर्यंत त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेल्या नाहीत .त्यांचे कुटुंब एका मुकादामाच्या टोळी सोबत पाटोदा परिसरातील एका शेतामध्ये ऊस तोडीचे सध्या काम करत आहेत. गुन्हेगारीचा शिका लागलेल्या पारधी समाजात जन्माला आलेले हप्पा पवार हे कष्ट करून दोन वेळच्या भाकरीत चंद्र शोधत आहेत. परिस्थितीमुळे लहानपणापासूनच शाळेत न जाता अगदी वयाच्या सातव्या वर्षापासून ऊसतोड कामगार असलेल्या आई-वडिलांसोबत त्यांनी ऊस तोडणी साठी कोयता हातात घेऊन ऊस तोडीचे काम सुरू केले आहे. एका वर्षापूर्वी गुजरात मधील वडोदरा येथे ऊस तोडणीला एका कारखान्यावर तेथे त्याच्यावर पायावरून ट्रेकची चा गेल्याने त्याचा एक पाय कायमचा अधू झाला ऑपरेशन करायचे म्हटले तर खिशात पैसे नव्हते म्हणून उपचार करता आले नसल्याने त्याचा पाय निकामी राहिला . हप्पा पवार यांच्या कुटुंबात वयोवृत्त आई असून ती गावीच राहत आहे .सध्या त्यांच्यासोबत पत्नी मिनाबाई मुलगा मुकेश व दोन मुली असे एकूण पाच जणांचे कुटुंब ऊस तोडणीचे काम करत आहे. घरी जमीन नाही शिक्षण नाही मग खाणार काय ,त्यामुळे ऊस तोडणी शिवाय दुसरा पर्याय नाही. सहा महिने ऊस तोडायचा प्रत्येकाला कसेबसे तीस हजार रुपये वाट्याला येतात. त्या जमा पुंजीवर वर्षभराची गुजरात करत आहेत . हे समजताच मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी कामगार वाहतूक मुकादम युनियनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. संजय तांदळे व पीव्हीपी कॉलेजचे प्रा. अशोक नागरगोजे यांच्या संयुक्त विद्यमाने महा सांगवी शिवारातील ऊस तोडणी फडात जाऊन ह भ प राधाताई महाराज यांच्या शुभ हस्ते दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली यावेळी ह भ प राधाताई महाराज यांनी हप्पा पवार कुटुंबीयांना मदतीचा हात देण्याचे अवहान केले आहे. यावेळी पत्रकार महेश बेदरे, प्रा. बाळासाहेब नागरगोजे ,रोटी बँक चे संतोष गर्जे ,स्वामी सानप व ऊस तोडणी कामगार पारधी कुटुंबीय उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow