मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अजिनाथ गवळी

मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अजिनाथ गवळी

शिरूर कासार (प्रतिनिधी) :-गोमळवाडा येथे यंदाचे एकता मराठी साहीत्य संम्मेलन होणार असून नियोजन पुर्वतयारी व स्वागताध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह युवक-युवतींच्या अंगीच्या सुप्त कलागुणांबरोबरच बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांचा शैक्षणिक आलेख सतत उंचावत ठेवण्याचा प्रयत्न करणारे एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यंदाचे ६ वे एकता मराठी साहित्य संमेलन गोमळवाडा ता.शिरूर कासार जि.बीड येथे येत्या डिसेंबर मध्ये संपन्न होणार असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा सिंदफना अर्बनचे संस्थापक आजीनाथ गवळी यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.यावेळी बोलताना गवळी यांनी स्वागताध्यक्ष म्हणून सर्वाना सोबत घेऊन राज्यपातळीवरील साहीत्यीक यांच्या उपस्थितीमधे संम्मेलन दर्जेदार व भव्यस्वरुपात होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

         गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गोमळवाडा येथे श्रीराम संस्थानचे महंत भानुदास महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकनेते गोपीनाथ मुंडे शिक्षक सह.पत.चे मा.चेअरमन दिलीपआण्णा जायभाये हे होते.फाउंडेशन चे कार्य अतिशय स्तुत्य असून यापुढील काळातही त्यांची उत्तरोत्तर भरभराट होईल असे शुभाशिर्वाद महंत भानुदास महाराज शास्रींनी याप्रसंगी दिले. यावेळी एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक अनंत कराड,सचिव पत्रकार गोकुळ पवार,उपाध्यक्ष प्राचार्य माही शेख,कोशाध्यक्ष शिवलिंग परळकर,संस्थापक सदस्य लखुळ मुळे,सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण,से.नि.केंद्र प्रमुख जालिंदर तावरे,कैलास खेडकर फौजी,रामनाथ सांगळे, महादेव कातखडे, अभिमन्यू कातखडे या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह गोमळवाडा येथील बबनराव सुरे,यूवानेते विनोद काकडे,उपसरपंच गणेश कातखडे,सुदाम पवार,पत्रकार प्रकाश साळवे,शहादेव पवार, अजिनाथ वीर,भीमराव सुरे, रामेश्वर धनवडे,दत्तु सुरे,शरद बनकर,महादेव पवार,भिवा साळवे,कचरू नरसाळे,अर्जुन पवार,कल्याण शिंदे,बाबासाहेब साळवे,नागनाथ पवार,चांगदेव सुरे,अर्जुन गर्जे, रामनाथ जेधे, अवधुत महाडीक,शिवाजी शिंदे, गणपत कनुजे,दिपक शिंदे,हरीभाऊ सुरे,अभिषेक गर्जे यांचेसह आदी ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार गोकुळ पवार, सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते समीर पठाण यांनी केले तर आभारप्रदर्शन महादेव कातखडे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow