बीड जिल्ह्यातील आणखी एका गुंडाची पोलीस अधीक्षकांनी हरसुल कारागृहात केली रवानगी

बीड प्रतिनिधी- शासकीय नौकरांवर हल्ला करणे, घराविषयी आगळीक करणे, अवैध शस्त्र बाळगणे, खंडणी मागणी, जबरी चोरी, दंगा करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा स्वरूपाच्या ९ गुन्ह्यांची नोंद असलेल्या अंगद खंडु काळ से (रा. महासांगवी, ता.पाटोदा) याच्याविरुध्द एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या सुचनेवरुन पाटोद्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी कुख्यात गुंड अंगद काळुसे याच्याविरुध्द असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. याप्रकरणी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी एमपीडीए कारवाईचा आदेश पारित केला. त्यानंतर पाटोद्याचे पोनि. मनिष पाटील व स्थागुशाचे पोनि. संतोष साबळे यांनी अंगद काळुसे या गुंडाला अटक करून आज पहाटे हार्सुल कारागृह औरंगाबाद येथे स्थानबध्द करण्यात आले. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, उपअधिक्षक धाराशिवकर, पोनि. संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. मनिष पाटील, पोउपनि राहल पतंगे, सचिन कोळेकर, सखाराम शिंदे, तवले, भागवत कुप्पे, गहिनीनाथ गर्जे यांच्यासह पोह अभिमन्यु औताडे, संजय जायभाये, यादव यांनी केली.
What's Your Reaction?






