बीडमध्ये एका कनिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बीडमध्ये  एका कनिष्ठ लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा सहनिबंधक कार्यालयामध्ये कारवाई केली असून, एका कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

तक्रारदाराच्या आईच्या नावावरील जमीन तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी, जिल्हा सहनिबंधक कार्यालयात मुद्रांक शुल्क भरून पावती आणि हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी, पंधराशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. विनोद गिरीधर मुनेश्वर या लाचखोर कनिष्ठ लिपिकाने लाच घेतली. यामध्ये 900 रुपयांची लाच व 600 रुपये फिस चा समावेश आहे. सदरील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow