लिंबागणेश येथे रात्री चोरट्यांनी चार पान टपऱ्या फोडल्या
बीड तालुक्यातील लिंबागणेश परीसरात चोरांचा धुमाकूळ सुरू असुन महिनाभरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेत धाडसी चोरी, त्यानंतर २ दिवसात २ घरफोड्या व ४ पानटप-यांमध्ये चोरी झाली असुन लिंबागणेश पोलिस चौकी मध्ये ४ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती असताना एकही कर्मचारी रात्री मुक्कामी थांबत नसल्याने एकंदरीत पोलिस प्रशासनाला चो-यांचे घेणे देणे नसुन त्यामुळे ग्रामस्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बीड तालुक्यातील लिंबागणेश जिल्हा परीषद सर्कलचे गाव असुन महिनाभरापूर्वी लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत २० लाखांपर्यंतची धाडसी चोरी झाली होती तिचा तपास अजूनही लागलेला नाही.त्यातच काही दिवसांपूर्वी वाहनातील डिझेल चोरीच्या घटना घडल्या होत्या.त्यानंतर दि.३० जुलै रोजी दिवसा लिंबागणेश येथील रहिवासी कमलबाई भगवान खिल्लारे यांच्या शेतातील घरी दिवसा तर मुळुकवाडी येथील दासु भिमराव ढास यांच्या घरी दिवसाच चोरी झाली होती.नेकनुर पोलिस स्टेशनचे एपीआय विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील ,लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे.संतोष राऊत , कांबळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.त्यातच दुस-या दिवशी दि.३१ जुलै सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास पोलिस स्टेशन आवारातील अमोल जाधव यांची मोरया पान सेंटर,सागर जाधव यांचे शिवनेरी पान सेंटर,विजय गायकवाड आणि बाबु पवार यांचे अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील लिंबागणेश बसस्थानक येथील टप-यांमध्ये चोरीच्या घटना घटल्या आहेत.
लिंबागणेश पोलिस चौकीत मुक्कामी पोलिस बंदोबस्त असावा:- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश पोलिस चौकी अंतर्गत ४ पोलिस कर्मचारी नियुक्त असताना एकही कर्मचारी मुक्कामी रहात नसुन याचा गैरफायदा चोरांनी उचलल्याने चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लिंबागणेश पोलिस चौकीत मुक्कामी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे.
What's Your Reaction?