पंकजा मुंडेंच्या पाठीशी जिल्ह्यातील अठरापगड जाती: सानप
रायमोहा:-(प्रतिनिधी)वैधनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंदराव कराड यांनी नूकताच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात पक्ष प्रवेश करून घेतला असला तरी याचा फारसा परिणाम भाजपाला होणार नाही असे पञक शिरूर कासार तालुका भाजपचे युवा नेते गोकुळ सानप यांनी प्रसिध्दीस दिले आहे यामध्ये भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंदराव कराड म्हणाले की त्यांना सतत डावलण्यात येत आहे कार्यक्रमाला आमंञण दिले जात नसायाचे असे आरोप करत कराड यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे माञ फांदीला आले मोडायाचे कावळ्याला आले उडायाचे असा प्रकार कराड साहेब यांच्या बाबतीत झाला आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ह्यात असताना फुलचंदराव कराड यांना एस टी महामंडळाचे संचालक,भाजपाचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष ही ओळख स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी महाराष्ट्रभर मिळवून दिली हे फुलचंदराव कराड यांनी विसरू नये आणि फुलचंदराव कराड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटात जाण्याने कसलाच आणि कोणताच परिणाम माजी मंञी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांच्यावर होणार नसल्याचे सानप यांनी पञकातुन म्हटले आहे तसेच पुढे प्रसिध्दीस दिलेल्या पञकात शिरूर कासार भाजपाचे युवा नेते गोकुळ सानप म्हणाले की होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीत माजी मंञी पंकजा मुंडे यांच्या सोबत अठरा पगड जाती समाज आहे त्यामुळे पंकजा मुंडे या लाखोंच्या मतांनी विजयी होणार आहेत लोकसभा निवडणूकीत रायमोहा जिल्हा परिषद गटातून ,रायमोहा पंचायत समिती गणातून खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश आण्णा धस,माजी आमदार भीमराव धोंडे,अभ्यासू कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के ,सर्जेराव तात्या तांदळे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयकुमार गोल्हार,वैजिनाथराव मिसाळ,यांच्या नेतृत्वाखाली जिवाचे रान करून लोकसभेच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मतांची आघाडी मिळवून देणार असल्याचे शिरूर कासार भाजपाचे युवा नेते गोकुळ सानप यांनी पञकातुन म्हटले आहे
What's Your Reaction?