ओबीसी महा एल्गार मेळाव्यास उपस्थित रहा! प्रकाश कानगावकर
बीड (प्रतिनिधी):- ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, भटक्या विमुक्त, एसबीसी समाज बांधवांनी बीड येथे दि.13 जानेवारी रोजी होणार्या महाएल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगांवकर यांनी केले आहे.
बीड येथे 13 जानेवारी रोजी छत्रपती क्रीडा संकुल येथे मा.ना.छगनरावजी भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा होणार असून यावेळी पालमंत्री मा.ना.धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजाताई मुंडेे, आ.गोपीचंद पडळकर, माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आ.नारायणराव मुंडे, प्रकाश अण्णा शेंडगे, मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे, प्रा.टी.पी.मुंडे यांच्यासह ओबीसी समाजातील बहुसंख्य नेते पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती रहाणार आहे. हा मेळावा भव्यदिव्य स्वरुपाचा व्हावा यासाठी ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, भटक्या विमुक्त, एसबीसी समाज बांधवांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी प्रकाशराव कानगावकर हे घेत आहेत. तरी या महाएल्गार मेळाव्यास समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी बारा बलुतेदार बहासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगावकर यांच्यासह धनगर कर्मचारी महासंघाचे अंकुश निर्मळ, मल्हार सेनेचे अमर ढोणे, सुवर्णकार समाजाचे अॅड. संदीप बेदरे, कैलास मैड, साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजु ताठे, परिट समाजाचे गणेश जगताप, अॅड.सुधीर जाधव, रमेश घोडके, कोष्ठी समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि म्हेत्रे, सुरेश असलेकर, भटके विमुक्तचे जिल्हाध्यक्ष डॉ.रमेश कैवाडे, एसबीसी संघटनेचे दगडू म्हेत्रे, सुतार समाजाचे बापुराव भालेकर, ओबीसी मुस्लिम समाजाचे रफीक बागवान, नाभिक समाजाचे गुलाब चव्हाण, रमेश राऊत, लोहार समाजाचे अशोकराव आनेराव, भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय घेणे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव, गोसावी परिषदेचे अॅड.बन, वाणी सामाजाचे योगेश कानडे, जंगम समाजाचे उमेश स्वामी, कासार समाजाचे रमेश रासणे यांनी केले आहे.
What's Your Reaction?