आठवले साहेबांच्या सत्कार समारंभास उपस्थित रहा: धम्मानंद वाघमारे

बीड प्रतिनिधी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) बीड जिल्हा आयोजित मा. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सत्कार समारंभ दी. 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे तरी आंबेडकरी विचारांच्या युवकांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजासमोर अनेक प्रश्न उभे आहेत. आपले प्रश्न सोडविण्यासाठी आपण आपली एकजूट दाखवणे महत्वाचे आहे. आपली एकजूट दाखवली तरच शासनालाही आपण आपल्या मागण्या पुर्ण करुन घेण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे आंबेडकरी युवकांनी कुठल्याही अमिषाला बळी न पडता स्वाभिमान बाळगून एकत्र या, असे आवाहन युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे यांनी युवकांना केले आहे .
रिपाईची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहील अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे साहेब यांनी दिली आहे .बीड जिल्हा रिपाईच्या वतीने 5 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा होणार असून स्वागत समारंभाच्या पार्श्वभूमीवर युवा नेते पप्पू कागदे हे बीड दौऱ्यातील प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेत आहेत.
तसेच महायुती मधील आपण एक महत्त्वाचे घटक पक्ष आहोत येणाऱ्या विधानसभेमध्ये कागदे साहेबांना आमदार झालेला बघण्याचे अनेक युवकांबरोबर धम्मानंद वाघमारे यांचे स्वप्न आहे त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी समूहातील सर्व युवक जेष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण बीड जिल्हा रिपाईच्या वतीने 5 ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन युवक रिपाई प्रदेशाध्यक्ष तथा रिपाईचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा न भुतो न भविष्यती असा करण्यासाठी पप्पूजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित राहण्याची आवाहन करत आहोत
मा. पप्पू जी कागदे साहेब हे स्वतःमागील 15 दिवसांपासून बीड जिल्ह्यातील प्रत्येक गाव, तालुक्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा बैठक घेत आहेत. आबेडकरी चळवळ जिवंत ठेवायची असेल तर युवकांची ताकद महत्वाची आहे. युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आंबेडकरी विचार पुढे घेऊन जायचा आहे, आपली एकजूट महत्वाची आहे. आपला स्वाभिमान कुठेही गहाण न ठेवता प्रस्थापितांसमोर आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आपली ताकद
दिसली तरच आपले प्रश्न सुटतील, आपल्या समाजातील लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत. तेव्हा आपली ताकत कायम एक ठेवा, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाईची ताकद वाढवण्यासाठी व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अहोरात्र मेहनत घेत राहील येणाऱ्या 5 तारखेला मोठ्या संख्येने बीड येथे होणाऱ्या सत्कार समारंभास व पपुजी कागदे साहेबांना विधानसभेत पाठवण्यासाठी उपस्थित रहा असे आवाहन भीम दल संघटना प्रमुख तसेच रिपाई युवक जिल्हा उपाध्यक्ष ॲड.धम्मानंद वाघमारे यांनी केले आहे.
What's Your Reaction?






