डीवायएसपी कार्यालयाला बाळासाहेब आंबेडकर टाळ ठोकणार!प्रा. किसन चव्हाण

(बीड प्रतिनिधी) आष्टी तालुक्यात वाळुंज गावच्या आदिवासी समाजाच्या महिलेची जमिनीच्या वादातून प्रस्थापित भाजपा आमदाराच्या कार्यकर्त्याकडून नग्न धींड काढून बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पीडित कुटुंबाची घटनास्थळी जाऊन भेट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्य उपाध्यक्ष तथा बीड जिल्हा प्रभारी यांना सूचना केल्या.त्या अनुषंगाने प्राध्यापक किसन चव्हाण यांनी बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळासह घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. प्रा.चव्हाण यांना पीडित कुटुंबाने घडलेली सर्व हाकिकत सविस्तर सांगून वंचित बहुजन आघाडी कडून न्याय देण्याची आग्रही मागणी केली.
प्रा. किसन चव्हाण तसेच त्यांच्यासोबतच्या शिष्ट मंडळांने थेट आष्टी पोलीस स्टेशन गाठून तपासात झालेली अक्षम्य देरंगाई बद्दल नाराजी व्यक्त करत येथेच ठिय्या आंदोलन करत आरोपींना तात्काळ अटक करून पिढीतांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.भ्रमणध्वनी द्वारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पोलीस तपासातील त्रुटी व पीडित कुटुंबीयांवर झालेला अन्याय याबद्दल सविस्तर माहिती दिली. तेव्हा एड.प्रकाश आंबेडकर यांनी 28 तारखेला आष्टी येथील डीवायएसपी कार्यालयाला टाळ ठोकून या घटनेचा निषेध करणार असल्याचे कळविले.
यावेळी भटके विमुक्त समितीचे राज्य समन्वयक अँड.अरुण जाधव,राज्य तक्रार निवारण समिती प्रमुख विष्णू जाधव,बीड जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,जिल्हा संघटक धम्मानंद साळवे, बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. गणेश खेमाडे, गणेश वीर, प्रशांत बोराडे,दिलीप माने,बाळासाहेब गायकवाड,सचिन मेघडंबर,रूपेश बोराडे,अमोल साखरे, बाळू गायकवाड,कृष्णा गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






