बाळासाहेब सोनटक्के एक सच्चा कार्यकर्ता

बीड प्रतिनिधी:- बाळासाहेब सोनटक्के हे हुन्नरी धाडसी ,कार्यकर्ता, सामाजिक काम करीत असताना जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही विचार न करता सतत जनतेच्या कामासाठी रात्रंदिवस रस्त्यावर असतात, तेलगाव पंचक्रोशीत कोणत्याही ,सामाजिक ,धार्मिक कार्यक्रमात बाळासाहेब हे दिसणारच, सामाजिक कार्याचा वसा व प्रचंड आवडत असल्याने शेतकरी , भूमिहीन , अपंग ,विधवा परितक्त्या, वृद्ध ,युवक यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बाळासाहेब सतत् प्रयत्नशील असतात,
तेलगाव परिसरातील आरोग्याचे प्रश्नासाठी बीड जिल्हा आरोग्य खात्याशी चांगला संपर्क आहे ,गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत कोणत्याही व्यक्तीला रक्तपुरवठ्याची गरज पडली तर ते तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला दवाखान्यापर्यंत सोबत घेऊन जाण्यापर्यंत त्यांचे सतत सहकार्य असते, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही ते नेहमी मदत करत असतात, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ,शेतकरी जगला पाहिजे, यासाठी नेहमी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असतात ,कापूस जिनिंग वर जर शेतकऱ्यांना काही अडचण येत असेल तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन जिनिंग मालकाशी बोलून तात्काळ त्या शेतकऱ्याला मदत करतात, सध्या तरुणांच्या हाताला काम नाही आणि तरुण बेरोजगार आहे तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे त्यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू असतो ,अनेक छोटे छोटे व्यवसाय त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विविध प्रशासकीय कार्यालय, बँका त्यांच्याशी संपर्क केला जातो, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळायला पाहिजे यासाठी बाळासाहेब नेहमी प्रयत्नशील असतात
बाळासाहेब नेहमी सामाजिक कार्यक्रम आयोजित करून वंचित उपेक्षित घटकांमध्ये जागृती घडून आणतात ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ,सेवालाल महाराज, सावता माळी ,संत सेना महाराज असे विविध महापुरुषांच्या जयंती कार्यक्रम घेऊन विविध समाजाला एकत्रित करून त्यांना एकतेचे व समानतेचे मार्गदर्शन करीत असतात ,या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करून महापुरुषांचे विचार आत्मसात करून त्या विचारानुसार आचरण करावे यासाठी बाळासाहेबांचा सतत प्रयत्न असतो
कौटुंबिक वादविवाद, सामाजिक वाद-विवाद ,टाळण्यासाठी संबंधित कुटुंब व सदरील समाजामध्ये समेट घडून आणण्यासाठी ही बाळासाहेबांची नेहमी पुढाकार
अशा या सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब यांचा तीन एप्रिल हा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी घेतलेला कार्याचा वसा व त्यांची कार्यची ओळख व्हावी यासाठी हा लेख लिहिला आहे अल्पशिक्षण असले तरीही मनातून समाजकार्य केले तर तो व्यक्ती नक्की समाजाच्या गळ्यातील ताईत होतो, हे बाळासाहेबांच्या कार्यातून सिद्ध होते अनेक महापुरुषांच्या विचारांचा त्यांच्या मनावर असणारा पगडा व बहुजन नायक कै, हनुमंतराव उपरे काका व कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांच्याकडून लहानपणापासूनच मिळालेले मार्गदर्शन यांच्यामुळे बाळासाहेब आज समाजात ओळखले जातात.
What's Your Reaction?






