जिल्ह्याच्या बाहेर चारा वाहतूक करण्यास बंदी, जिल्हादंडाधिकारी
बीड प्रतिनिधी :- जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पशुधनासाठी चा-याची टंचाई होण्याची गंभीर शक्यता असल्याने जिल्हयाबाहेर चारा वाहतूक करण्यास मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आले.
जिल्हयात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असून भविष्यात पशुधनासाठी चा-याची टंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्हयात मागील वर्षाच्या पेरणी अहवालानुसार दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी 186458.77 मे. टन चारा शिल्लक असून तो अंदाजे 43 दिवस पुरेल चा-याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासु शकते.
जिल्हयात उपलब्ध होणारा सर्व प्रकारचा चारा याची इतर जिल्हयात वाहतुक करण्यास बंदी आणने जिल्हयाबाहेरील निविदा धारकांना लिलाव देण्यात येऊ नये. करुन बीड जिल्हयात चारा टंचाई भासणार नाही.तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जिल्हादंडधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार बीड जिल्हयात उत्पादित होणारा किंवा सद्यस्थितीत असणारा सर्व प्रकारचा वाळलेला व ओला चारा बीड जिल्हयाबाहेर वाहतुक करण्यास पुढील आदेश येईपर्यंत मनाई करण्यात आली आहे.
What's Your Reaction?