मातृभूमी प्रतिष्ठानकडून बंडू खराटे सन्मानित

मातृभूमी प्रतिष्ठानकडून बंडू खराटे सन्मानित

शिवशाहीर बंडू खराटे मातृभूमी प्रतिष्ठानकडून सन्मानित सन्मानित करण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देऊन डॉक्टर संजय यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा:  दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; तिघांवर गुन्हा दाखल 

 राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांच्यासह महामानवांचे विचार व त्यांच्या जीवनावरील पोवाडे शाहिरीच्या काव्यातून अजरामर करणारे राष्ट्रीय शिवशाही बंडू खराटे हे धाराशिव जिल्ह्यातील भोगजी गावच्या शेतकरी ऊसतोड कामगार निरक्षर कुटुंबातील एक तरुण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आपल्या कलेच्या माध्यमातून महामानवांच्या इतिहासाची हुबे हुब रचना व त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा त्यांच्या माध्यमातून होत आहे.गावातच त्यांचे इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण झाले असून, इयत्ता पाचवी पासून त्यांना कविता पोवाडे गायन करण्याचा छंद होता ,शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या शायरीचा त्यांच्यावर प्रभाव पडून 1996 ला मराठवाडा विद्यापीठामध्ये राज्यस्तरीय युवक महोत्सवामध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव माहेकर महाविद्यालय कळंबचे प्रतिनिधित्व करत तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यासमोर राष्ट्रसंत भगवान बाबा याच्या जीवनावरील पोवाडा गायला ,मुंडे साहेबांनी त्यांचे भरभरून कौतुक केले व या क्षेत्रातच करिअर करण्याचा त्यांना सल्ला दिला.

हेही वाचा: 13 वर्षाच्या मुलीला इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकी

लक्ष्मण देशपांडे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एम ए नाट्यशास्त्र पदवी संपादन केल्यानंतर बीएड चे शिक्षण पूर्ण केले.शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोवाडे, लोकगीते, व्यसनमुक्ती ,ऊसतोड मजूर, हुंडाबंदी ,राष्ट्रीय एकात्मता, आदि विषयावर राज्यातील गावागावात जाऊन लोकांचे प्रबोधन केले. राष्ट्रीय संत भगवान बाबा व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर देखील त्यांनी चार पोवाडे गायले असून ते राज्यभर व देशभर गाजले आहेत.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे. बंडू खराटे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात. त्यांना आतापर्यंत 11 राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत .डॉ.तात्याराव लहाने,अॅड. उज्वल निकम, विश्वनाथ अण्णा लोणकर आदी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. आजवर त्यांनी दहा हजार पेक्षा जास्त कार्यक्रम घेतल्याबद्दल दिनांक 16 जून 2023 रोजी ते एका कार्यक्रमानिमित्त बीडमध्ये आले असता, त्यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अॅड. सर्जेराव तात्या तांदळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला ,यावेळी डॉ संजय तांदळे, मेजर बाळासाहेब कुलथे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow