ऑनलाइन चक्री जुगाऱ्यांवर बीड सायबर पोलिसांची धाड

सायबर पोलीस बीड यांची ऑनलाईन चक्री जुगारावर पत्र्याच्या शेडमध्ये धडक कारवाई करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईने खळबळ उडाली आहे.
सायबर पोलीस बीड यांनी पाटोदा हद्दीत बस स्थानक समोर पत्र्याचे शेड मध्ये चालु असलेल्या ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर धाड टाकुन धडक कारवाई केली. सदर कारवाईत ऑनलाईन चक्री जुगार खेळणारे व खेळविणारे असे एकुन नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीतांच्या ताब्यातुन दोन मोबाईल, दोन लॅपटॉप ईनटरनेट मोडेम, तीन दुचाकी व रोख रक्कम असे सर्व मिळुन एकुन 2,81,430/- रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आले आहेत. पोअ 955 अजय जाधव नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरून पाटोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत. सर्व नागरीकांनी ऑनलाईन पध्दतीने आर्थिक व्यवहार करताना आलेले फोन, SMS ची खात्री करुनच व्यवहार करावा असे सायबर पोलीस स्टेशन, बीड तर्फे आवाहान करण्यात येत आहे. तरी आपणास कळविण्यात आनंद होत आहे कि,
सदर कामगीरी मा. पोलीस अधीक्षक बीड श्री नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक आर. एस. सानप, पो उपनि शैलेश जोगदंड, म पो उपनि टी. एम. खुळे, पोह/ बप्पासाहेब दराडे, पोह/ आशिष वडमारे, पोना/ विजय घोडके, पोना/ अनिल डोंगरे, पोना/22 श्रीकांत बारगजे, पो प्रदिप वायभट, पोअ/अमोल दरेकर, पोअ अजय जाधव व संपूर्ण युनिट सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.
What's Your Reaction?






