भाई गौतम आगळे पोलिसांच्या नजर कैदेत
रोजंदारी मजंदुर सेना केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे सर यांना व कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने अचानक कामावरून कमी केल्यामुळे त्यांना पूर्ववत कामावर घेऊन कायम करण्याच्या न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद कार्यालय बीड येथे 13 जून पासून रोजंदारी मजदुर सेनेचे केंद्रीय महासचिव तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भाई गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू असून सदर कामगारांना पूर्ववत कामावर घेऊन त्यांना कायम करण्यात यावे अन्यथा बीड जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात येईल असा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
सदर आंदोलनाची जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज दिनांक 30 जून 2023 रोजी रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे यांना परळी येथून धारूर येथे नजर कैदेत ठेवले असून मराठवाडा अध्यक्ष भाई राजेशकुमार जोगदंड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता बचुटे यांना बीड येथून उचलून पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे नजर कैदेत ठेवण्यात आले आहे तसेच राजेश कुमार जोगदंड शहर प्रसिद्धीप्रमुख यांनाही पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.
सदर रोजंदारी कामगारांचा गेल्या ०९ वर्षांपासून संघर्ष चालू असून त्याची प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यामुळे कामगार मजदूर सेनेच्या वतीने आज 30 जून 2023 रोजी बीड जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा आणण्याचा इशारा देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने संबंधित रोजंदारी मजदुर सेना पदाधिकाऱ्यांना भल्या पहाटेच सकाळी सहा ते रात्री सहा या वेळेत ताब्यात घेऊन कुठलीही लेखी पूर्वसूचना न देता नजर कैदेत ठेवल्यामुळे गोरगरिबांच्या व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणून मुस्कटदाबी तर केली जात नाही ना असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. सदर रोजंदारी मजदुर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे ,अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
What's Your Reaction?