धोंडराईचे भीमनगर सहा दिवसापासून अंधारात

लक्ष्मीकांत भालेराव बीड: गेवराई तालुक्यात धोंडराई महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असून,गेली सहा दिवसापासुन भीमनगर अंधारात आहे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तरी तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही दिवंसापासुन धोडंराई भीम नगर येथील वादळी वाऱ्याने वीजवाहक तार पडली असता, येथीलच विज ग्राहक यांच्या छता नजीक पडली असता, भीमनगर येथील लाईनमन यांना वारंवार कळवुन सुद्धा दखल घेतली जात नाही. लाईन मनचे असे म्हणने येते की, ज्या विज ग्राहकाच्या छताजवळ ती तार पडली तो ग्राहक विज जोडण्यास विरोध करत आहे.म्हणुन सर्व भीमनगर यांनी मीळुन धोडंराई सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय येथे येऊन अर्जाद्वारे, या घटनेची दखल घेऊन लवकरात लवकर लाईट चालु करावी अशी मागनी केली आहे. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य प्रकाश प्रधान ,मेघनाथ प्रधान,भीमा सर बन्सोडे ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?






