भीमराव धोंडे यांनी पहाटे मैदानावर युवकांशी साधला संवाद
आष्टी प्रतिनिधी :- आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे मैदानावर व्यायाम करताना,व्यायामाला आलेल्या युवाकांशी संवाद साधत सुखी जिवनासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करावा तसेच निर्व्यसनी राहावे या निवडणुकीत कोणाच्याही भूलथापांना बळी पडून व्यसनाच्या आहारी जाऊ नका. व्यसनाने माणसाचे आयुष्य बरबाद होते, कुटुंब उघड्यावर पडते त्यामुळे व्यसनापासून दूर रहा असे आवाहन करीत माझे चिन्ह शिट्टी असुन या चिन्हाला मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
याबाबत माहिती अशी की, सध्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. दोन दिवसापासून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अपक्ष उमेदवार माजी भीमराव धोंडे हे कबड्डी व कुस्ती मधील एक राष्ट्रीय खेळाडू आहेत. कबड्डी व कुस्तीमध्ये त्यांनी नावलौकिक मिळवले आहे. खेळामुळेच ते राजकारणात आले आहेत. आणि आमदारही झाले. आजही ते नियमित व्यायाम करतात. पहाटे साडेपाचला मैदानावर असतात नित्यनियमाप्रमाणे आज बुधवारी सकाळी व्यायामासाठी आष्टी येथे मैदानावर गेले असता अनेक युवक व नागरिक मैदानावर व्यायामासाठी आले होते त्यांनी सर्व युवकांना एकत्रित बोलावून नियमित व्यायाम करण्याचे फायदे सांगितले. उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले की, मी दररोज पहाटे साडेपाच वाजता मैदानावर येतो एक ते दीड तास व्यायाम करतो. नियमित व्यायाम करा तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील. तसेच नियमित व्यायाम केल्याने माणसं निरोगी राहतात तसेच नियमित व्यायामाने व विविध प्रकारच्या खेळामुळे युवकांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. चांगला खेळाडू तयार झाल्यास भविष्यात खेळाडूंना नोकरीच्या भरपूर संधी आहेत. तरी प्रत्येकाने रोज मैदानावर यावे,नियमित व्यायाम करावा आणि आपले भविष्य उज्वल करावे आई-वडिलांचे नावलौकिक करावे, निर्व्यसनी रहावे निवडणुकीत कोणाच्याही व कसल्याही आमिषाला बळी न पडू नये. तसेच मी सध्या निवडणुकीला उभा आहे " शिट्टी " हे माझे चिन्ह असून शिट्टी समोरील बटन दाबून मला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
What's Your Reaction?