बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र खेळाडू अविनाश साबळेला सुवर्णपदक
क्रीडा:- महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे याने एशियन गेम्सच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
तसेच एथलेटिक्स स्पर्धांमधलं भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. चीनमधून भारतासाठी ही भारतासाठी ही 'गोल्ड' बातमी आलीये. तर अविनाशच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तर आता भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांची संख्येत वाढ झाली आहे. चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या 38 पर्यंत पोहचली आहे. भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. यजमान चीन अव्वल स्थानावर आहे. जपान दुसऱ्या तर रिपब्लिक ऑफ कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
What's Your Reaction?