अवैध गुटख्याच्या टेम्पोवर मोठी कारवाई,01 कोटी 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

बीड प्रतिनिधी:- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या पथकाने अवैध रित्या गुटख्याची वाहतूक करणारे कंटेनर पकडुन एकूण किमती 1,00,80,150/- (एक कोटी अंशी हजार एकशे पन्नास रुपये) रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
सविस्तर माहिती अशी की, मा. पंकज कुमावत साहेब, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, चौसाळा कडून गेवराईकडे एक कंटेनर क्रमांक TS 07 UN 1894 हे चौसाळा कडून गेवराई कडे गुटका घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्या वरुन पंकज कुमावत साहेब यांनी त्यांचे पथकातील कर्मचारी यांना सदर ठिकाणी पाठवून दिनांक 10/11/2023 रोजी सकाळी बीड बायपासवर लक्ष्मी चौकामध्ये सदर कंटेनर ताब्यात घेऊन कंटेनर मधील सागर पान मसाला व गुटखा जप्त करून मिळून आलेला एक आरोपी व ईतर दोन अशा एकूण तीन आरोपी वर गुन्हा दाखल करुन नमूद आरोपी कडून एकूण किमती 1,00,80,150/-(एक कोटी अंशी हजार एकशे पन्नास रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन एकुण 03 आरोपी विरुद्ध बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब व ASP पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील बाबासाहेब डापकर, दिलीप गीते, भरत शेळके, गोविंद मुंडे, महादेव बहिरवाळ, शमीम पाशा यांनी केली आहे
What's Your Reaction?






