दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

बीड प्रतिनिधी: जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली असून जिल्ह्यातील विधिध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांना गोपनीय माहिती मिळाली की बीड शहरातील बार्शी नाका भागात चोरलेली स्कूटी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी कारवाईचे आदेश देताच बार्शी नाका भागात सापळा लावत मुरकुटे व पथकातील कर्मचारी यांनी दोन चोरट्याने पळून जाताना शिताफीने पकडले. असता त्यांच्या कडून सुझुकी बर्गमन कंपनीची स्कूटी सह दोघांस ताब्यात घेतले आरोपींना नाव 1) सचिन रामनाथ अंबुरे रा.चिचवन ता.जी. बीड2) शेख नूर लाला रा. चिंचवन ता.जिं. बीड असे नाव सांगितले. त्यांच्या कडून 10 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. तर तिसरा आरोपी रणवीर तोंडे हा फरार असल्याची माहिती आहे. 10 मोटरसायकल मिळून सहा लाख अंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यांच्याकडून कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पोलीस तपास करत आहेत. कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांनच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सिद्धेश्वर मुरकुटे, तुळशीराम जगताप, पी. टी. चव्हाण, विकास राठोड राहुल शिंदे, बाळू सानप, विकी सुरवसे, देविदास जमदाडे, चालक उगले यांनी ही कारवाई केली.
What's Your Reaction?






