बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह
नवनाथ गोरे प्रतिनिधी
उमरद खालसा येथील तरुण काल दिनांक ८ जुलै पासुन घरातुन बेपत्ता होता. आज रविवार दिनांक ९ रोजी गावाच्या जवळील तलावाच्या बाजूच्या विहिरीत सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान त्या तरुणाच्या पायातील चप्पल विहिरीत आढळून आल्या. नंतर ही बाब लगेच पिंपळनेर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. महिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अशोक दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली सकाळी ९ वाजल्यापासून पोलीस आणि ग्रामस्थ विहिरीत गळ टाकून मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्न करत होते. परंतु गळाला काही येत नव्हते शेवटी पाण्यात कॅमेरा सोडण्यात आला आणि चार तासाच्या परिश्रमानंतर त्या तरुणाचा मृतदेह दुपारी १ वाजण्याचा दरम्यान बाहेर काढण्यात पोलीस आणि नागरीकांना यश आले .
गणेश नारायन कोल्हे वय १८ वर्ष राहणार उमरद खालसा असे मयत तरुणाचे नाव आहे तो काल घरातून बाहेर पडला. त्याचा मृतदेह आज विहिरीत आढळुन आला. गणेश याचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर काही लागल्या असल्याच्या खुणा आढळुन आल्या आहेत. हा घातपाताचा संशय असल्याची व्यक्त केली जात आहे. गणेश याने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजु शकले नाही पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?