डॉ तांदळे यांच्या प्रांगणात ब्रह्मकमळ फुलले

डॉ तांदळे यांच्या प्रांगणात ब्रह्मकमळ फुलले
फुललेले ब्रह्मकमळ

बीड प्रतिनिधी) : शहरातील मित्र नगर भागातील, समता कॉलनी मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय तांदळे यांच्या निवासस्थानी प्रांगणामध्ये नम्रता राजेंद्र तांदळे हिने 14 वर्षांपूर्वी सांगली येथून ब्रह्मकमळाची रोपटे बीडमध्ये आणून प्रांगणात रोपटे लावून त्याचे उत्तम रित्या संगोपन केले होते.दिनांक 19 जुलै 2023 रोजी रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान या वेलीला चार ब्रह्मकमळाची फुले एकाच वेळी उमललेली दिसली, सर्वांनाच उमललेली फुले पाहून आनंद झाला. या फुललेल्या ब्रह्मकमळ फुलांची नम्रता तांदळे, सुलभा तांदळे, अनिरुद्ध तांदळे, डॉ संजय तांदळे आदींनी पूजा केली.ब्रह्मकमळ हे कमळा चा एक प्रकार असून सूर्यफुलाच्या कुळातील ही एक दुर्मिळ वनस्पती असून ती हिमालयावर 13000 ते 17000 फुटावर पाहायला मिळते.जुलै -ऑगस्ट महिन्यामध्ये या ब्रह्मकमळाला बहर येत असतो .ब्रह्मकमळ साधारण एकटे दुकटे नसते, ते तीन ते चार फुलांच्या गटामध्येच आढळते.हे हिमालयाचे फुल उत्तराखंड राज्याचे राज्यपुष्प आहे. बद्री केदारनाथाच्या मंदिरात देवाला ब्रह्मकमळ वाहायची परंपरा आहे.त्यामुळे या पुष्पाला देवपुष्प असे देखील म्हटले जाते.सध्या दुर्मिळ होत चाललेले हे फुल वाचवण्यासाठी शासनाने या ब्रह्मकमळाच्या रोपाला संरक्षित रोपाचा दर्जा देण्यात आला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow