बीड शहरात नव्याने एमआयडीसी उभी करा! अशोक ढोले
प्रतिनीधी (बीड) बीड शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांनी दि. 27/08/2023 रविवार रोजी होणाऱ्या सभेसाठी उपमुख्यमंत्री मा. ना. अजीत दादा पवार व कृषीमंत्री मा. ना. धनंजय मुंडे हे दोन दिग्गज नेते बीड शहरामध्ये येणार असुन त्याप्रसंगाचे अनुषंगाने बीड शहरामध्ये विविध विकास कामे खोळंबली असुन बीड जिल्हयातील तरुणांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याचे अधोरेखीत केले आहे.
बीड जिल्हयाची ओळख ही केवळ ऊसतोड कामगाराचा जिल्हा एवढीच मर्यादीत न ठेवता बीड जिल्हयातील उच्च शिक्षीत तसेच विविध औद्योगिक कोर्सेस उत्तीर्ण झालेल्या तरुणांना तसेच जिल्हयातील मिळेल ते काम करुन मजुरी करणाऱ्या नागरीकांना कायमस्वरुपी हातास काम मिळुन त्यांचे व त्याचे कुटूंबीयाची आर्थिक होणारी आर्थिक वाताहात थांबवण्यासाठी नव्याने एम.आय.डी.सी.ची उभारणी करुन त्यामध्ये विविध उद्योगधंद्यांना चालना मिळणेसाठी अद्यायावत अशा स्वरुपाची एम.आय.डी.सी. उभारुन त्यामध्ये विविध उद्योग धंद्यासाठी तरुणांना विविध शासकीय योजनांखाली सवलत देऊन त्यांची आर्थिक घडी बसवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोले यांनी केली आहे.
तसेच त्यांनी बीड शहरामध्ये असणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांची असलेली समस्या त्यांचेसमोर मांडणार असुन शहराला जोडणारा मुख्य रस्ता जालना रोड ते बार्शी नाका परिसर तसेच शिवाजी महाराज पुतळा ते चऱ्हाटा फाटा या रोडमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात पत्रक देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच विविध प्रश्नांबद्दल त्यांचेशी सकारात्मक चर्चाकरण्यासाठी सामाजिक कायकर्ते अशोक ढोले व त्यांचा मित्र परिवार प्रयत्नशील असलेचे त्यांनी नमुद केले.
What's Your Reaction?