लिंबागणेश येथे भर दिवसा घरफोडी

लिंबागणेश येथे भर दिवसा कमलबाई खिल्लारे यांच्या घरी घरफोडी झाल्याची घटना घडली यावेळी तात्काळ घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी येऊन पंचनामा केला
आज दि.३० जुलै रविवार रोजी सकाळी रानात कामासाठी गेलेल्या कमलबाई भगवान खिल्लारे वय ६० वर्षे आपली नात पल्लवी वय १४ हिच्यासह दररोज प्रमाणे स्वतः:च्या शेतात कामासाठी गेले होते.सायंकाळी ५ वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. भाचा दिनेश वायभट यांना कळवले असता त्यांनी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.हे. राऊत संतोष यांना फोनवरून चोरीच्या घटनेची कल्पना दिली असता.पोलिस उपनिरीक्षक अजय पानपाटील व पो.हे.संतोष राऊत घटनास्थळी दाखल झाले. श्रीमती कमलबाई खिल्लारे यांच्या म्हणण्यानुसार काही रोख रक्कम व सोनं चोरीला गेल्याचे सांगितले.पुढील तपास नेकनुर पोलिस करत आहेत.
What's Your Reaction?






