बोगस प्रमाणपत्राची सीबीआय चौकशी करा! दत्ता प्रभाळे
राज्यासह बीड जिल्हातील बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून देणारे अधिकारी व दलालाची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करा अशी मागणी प्रा. दत्ता प्रभाळे यांनी केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बोगस प्रमाणपत्र च्या आधारे पोलीस भरती निवड झालेल्या उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र काढल्याबद्दल पोलिस प्रशासन राज्यामध्ये पोलीस भरतीमध्ये उचलबांगडी करत आहे, परंतू मुख्य बोगस प्रमाणपत्र काढून देणारे सुत्रधार भूसंपादन अधिकारी व दलाल यांचा या प्रकरणात सक्रिय सहभाग असताना बोगस प्रमाणपत्र धारक 222 जी मुले पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झाले आहेत यांना चौकशी करण्याच्या प्रयत्नाने अटक करत आहे,परंतु यात भूसंपादन व जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील भूसंपादन अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही ठराविक दलालांनी बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून दिले या प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांना चौकशी साठी अटक करण्यात आली, परंतु मुख्य सुत्रधार आरोपी असणारे तत्कालिन अधिकारी व दलाल मंडळी मोकाट फिरत आहे यांच्यावर सीबीआय मार्फत चौकशी करून सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कडे केली,या बोगस पोलीस भरतीकडेगृहमंत्र्यांनी स्वतःहून जातीने लक्ष देऊन बोगस प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढून देणाऱ्या अधिकाऱ्यावर व दलाल मंडळी वर कडक कारवाई करून अधिकारी यांना अटक करत तात्काळ निलंबित करावे अशी मागणी बीड जिल्ह्यातील युवा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष डॉ .पंडित तुपे सर, युवक काँग्रेस बीड जिल्हा सरचिटणीस प्रा .दत्ता प्रभाळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे गृहमंत्री मा .देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
What's Your Reaction?