अहमदनगरमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी मंत्रिमंडळात मान्यता

राज्य मंत्रिमंडळाची आज अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष होते.

अहमदनगरमध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी मंत्रिमंडळात मान्यता

त्यातील अहमदनगर जिल्ह्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली व अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये (विधि व न्याय विभाग) साठी मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयाचा मोठा फायदा जिल्ह्याला होणार आहे. बैठकीतील हा निर्णय अहमदनगर जिल्हावासीयांसाठी अत्यंत महत्वाचा सिद्ध होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राहाता येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु करण्यात येईल. १९ नियमित पदे व ६ मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्धारे घेण्यास मान्यता देण्यात आली यासाठी एकूण २ कोटी १३ लाख ७६ हजार ४२४ इतका खर्च येईल.

कोपरगाव न्यायालयाकडून या न्यायालयात एकूण १३३६ प्रकरणे वर्ग होणार आहेत. राहाता न्यायालयाच्या क्षेत्रात प्रलंबित खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान या बैठकीत इतर अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यातील प्रमुख म्हणजे. या बैठकीत मुलींसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. लेक लाडकी योजना कार्यान्वयीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यानुसार आता मुलीचा जन्म झाल्यास १ लाख १ हजारांची मदत केली जाणार आहे. दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे नमो शेतकरी योजना लागू करण्यात आली आहे. आता केंद्राप्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचे वर्षात ३ हप्ते देईल.

इतर निर्णय –

  • पात्र असणाऱ्या माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळेल.
  • फलटण – पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करण्यात येणार आहे
  • नागपूर या ठिकाणी भोसला मिलिटरी स्कूलला जमीन देण्यात येणार आहे
  • औरंगाबाद ऐवजी आता छत्रपती संभाजीनगर असा विद्यापीठाच्या नावात बदल

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow