डॉ साबळे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करा! डॉ तांदळे

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षपणे काम करत असून सामान्य, मध्यमवर्गीय ,गोरगरिबा च्या सेवेत 24 तास उपलब्ध राहून उत्तम रीतीने वेळेवर आरोग्यसेवा देत आहेत .त्यासाठी जिल्हा रुग्णालयात नवनवीन तंत्रज्ञानाच्या मशीन आणून महागड्या शस्त्रक्रिया देखील जिल्हा रुग्णालयात केलेल्या आहेत.जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात बाह्य यंत्रणेने मार्फत नोकर भरती केलेली आहे यात जिल्हा शल्य चिकित्सकांचा काडी मात्र ही संबंध येत नाही, त्यांच्यावर दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी अधिवेशनात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केली आहे.त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना परत सन्मानाने रुजू करून घ्यावे अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने डॉ.संजय तांदळे यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.मागणी मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी एस. एम .युसुफ, सुदाम कोळेकर, पांडुरंग आंधळे आदि उपस्थित होते
What's Your Reaction?






