बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडला
50 हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश मंजूर करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाच्या एका नातेवाईकास रंगेहात पकडले सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड च्या वतीने आज बुधवारी दुपारी केली आहे.
चेकची मंजूरी घेण्यासाठी तालखेड शाखेचे बाबासाहेब कांडेकर यांनी हा चेक जिल्हा बँकेच्या मुख्य ऑफिसला पाठविला. त्या चेकची मंजुरी जिल्हा बँकेचे मुख्य व्यवस्थापक ठोंबरे यांच्याकडून घेण्यासाठी ठोंबरे यांचा नातलग प्रथीमेश उर्फ बाळू ठोंबरे याने तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची मागणी केली. हीच वीस हजार रुपयाची लाच आज बुधवार दिनांक 07 जून रोजी दुपारी स्विकारताना बाळू ठोंबरे यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी केली.सदर कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली.
सर्व बातमी आत्ता एकाच क्लिक वर Downloadअँप
What's Your Reaction?