चकलांबा पोलिसांची देशी विदेशी व हातभट्टी दारूवर कारवाई
बीड प्रतिनिधी :- चकलांबा ठाण्याच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, विविध ठिकाणी कारवाई करत, देशी-विदेशी दारू जप्त करून काही ठिकाणी हातभट्टी रसायन नष्ट केले आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
चकलंबा पोलिसांची मोठी कारवाई गैबी नगर येथील हातभट्टी अड्डा उध्वस्त करत हायवेवरील तीन धाब्यावर धाड, 6,990 रुपयाचे रसायन जागीच नष्ट 21 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की, पोलीस ठाण्याचे हद्दीतून जाणारा 222 नंबरच्या हायवे वरती काही हॉटेल धाब्यावरती अवैध दारू विक्री होत आहे. माहिती मिळताच खात्री करून स्वतः सदर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वेळी धाड टाकली असता 222 हायवेवरील हॉटेल महाराजा, हॉटेल दिव्या गार्डन, हॉटेल साई श्रद्धा यावर मोठ्या प्रमाणावर देसी व विदेशी दारूचा साठा मिळून आल्याने तो लागलीच जप्त जप्त करून आरोपी नामे गोरख आसाराम जोगदंड रा कोळगाव ता गेवराई जि बीड ,सतीश बाबासाहेब आहेरकर रा कोळगाव ता गेवराई जि बीड रोहित दिलीप तू ळवे रा पेंडगाव ता जि बीड संतोष किसन जाधव वय 32 राहणार गैबी नगर तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन दारूबंदी कायदा कलम( 65)( इ ),(65)( फ ) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार 43 बारगजे, पोलीस हवालदार येळे करत आहेत.सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर मिरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, पोलीस उपनिरीक्षक तांगडे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, प्र पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोह येळे, पो सी खटाणे पो सी सुरवसे, चालक पोलीस हवालदार सानप. चालक पोलीस शिपाई गरजे यांनी केली आहे.
What's Your Reaction?