पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
१२ जूनपर्यंत राज्यातील मुंबईसह कोकण, खान्देश नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. 'बिपॉरजॉय' चक्रीवादळ सकाळी गोवा ते येमेन देशाच्या आग्नेय किनारपट्टी दरम्यान सरळ रेषेत जोडणाऱ्या अंतराच्या मध्यावर खोल अरबी समुद्रात आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसानदेही परिणाम होण्याची शक्यता कमीच वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.
एक जून या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून चार दिवस उशिराने म्हणजे चार जूनला येणं अपेक्षित होतं. त्यातही कमी अधिक चार दिवसाचा फरक जमेस धरून तो केरळात एक जून ते आठ जून या आठ दिवसादरम्यान कधीही दाखल होवु शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याकडून यावर्षी आगमनासंबंधी वर्तवले गेले होते. त्याप्रमाणं मान्सून गुरुवार दिनांक ८ जुनला केरळमध्ये दाखल झाला आहे. हा दाखल झालेला नैऋत्य मान्सून आगमनाच्या अटी पुर्ण करून दाखल झाला आहे. जवळपास कव्हर करून देशाच्या भुभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर आणि तामिळनाडूतील कोडाईकनल तसेच आदिरामपट्टीनाम शहरातून जाते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर त्याची विशेष नुकसान देही परिणाम होण्याची शक्यता कमी वाटत असल्याची माहिती खुळे यांनी दिली
What's Your Reaction?






