मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार आज संध्याकाळी मनोज जरांगे यांना भेटणार

मुंबई प्रतिनिधी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जातील. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचं उपोषण आज सुटणार का? असा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इथे येऊन उपोषण सोडवावं, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. ही अट देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. एकनाथ शिंदे हे अजित पवारांसह दुपारी साडेतीन वाजता मुंबईहून जालन्यासाठी रवाना होतील.
मनोज जरांगे यांच्या याआंदोलनामुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं आहे. लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यभर ठिकाणी आंदोलन, रास्तारोको करण्यात आले होते. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी जाणार आहेत. त्यामुळे त्यांची आजचीही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे.
What's Your Reaction?






