परळीचे मुख्याधिकारी तहसीलदार यांचे गणेश भक्तांना आवाहन

परळीचे मुख्याधिकारी तहसीलदार यांचे गणेश भक्तांना आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहर आणि परिसरात पाऊस कमी झाल्याने श्रींच्या विसर्जनासाठी असलेल्या हरिहर तिर्थामध्ये पाणी नाही. त्यामुळे प्रशासनाने उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या सुचनेवरून गणेश विसर्जनाचे नियोजन केले आहे. 3 फुटांपेक्षा कमी उंचीच्या श्रींची मुर्ती नगर परिषदेकडे जमा करायच्या आहेत तर सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या मुर्ती नंदनज येथील बोरना तलावात विसर्जित कराव्यात असे पालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, तहसीलदार गोविंद पेदेवाड, पोलिस निरीक्षक रवि सानप (परळी शहर पोलीस स्टेशन) , सलीम चाऊस (संभाजीनगर पोलीस स्टेशन) आणि हेमंत कदम (परळी ग्रामीण पोलीस स्टेशन) यांनी केले आहे.

         यावर्षी परळी शहर व परिसरात परिसरात अतिशय कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रतिवर्षी ज्या हरिहर तिर्थामध्ये श्रींच्या मुर्तींचे विसर्जन केले जाते ते त्या तिर्थात पाणी नाही. गणेश विसर्जन करण्याच्या नियोजनासंदर्भात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरीकांची बैठक झाली. या बैठकीत सर्व दृष्टीने विचार विनिमय करून गणेश विसर्जनाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या सार्वजनिक किंवा घरगुती गणपती मुर्तीची उंची 3 फुटांपेक्षा कमी आहे अशांनी आपल्या मुर्ती मंडळांनी मिरवणूकीनंतर बेलवाडी येथे नगर परिषद कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावी. संकलीत झालेल्या मुर्ती नंतर नंदनज येथील बोरना तलावात विसर्जित केल्या जाणार आहेत. तर ज्या गणेश मंडळाच्या मुर्तीची उंची 3 फुटांपेक्षा जास्त आहे अशा गणेश मंडळांनी त्यांच्या श्रींच्या मुर्तींचे विसर्जन नंदनज येथील बोरना तलावात करावे असे निश्चित करण्यात आले आहे.

        हरीहर तिर्थामध्ये पाणी हे नसल्याने हे नियोजन करण्यात आले असुन सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, तहसीलदार गोविंद पेदेवाड, परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवि सानप, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow