सुषमा अंधारे प्रकरणात ‘त्या’ नेत्याला पोलीसांकडून क्लिनचीट
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे sushama andhare या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसापुर्वी त्यांच्या बीड येथील सभेपुर्वी तत्कालीन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव appasaheb jadhav यांनी त्यांच्या कानसुलात लगावल्याचा दावा केला होता. तर त्याहीपुर्वी छत्रपती संभाजीनगरचे आ.संजय सिरसाठ sanjay sirsath यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी […]
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे sushama andhare या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. काही दिवसापुर्वी त्यांच्या बीड येथील सभेपुर्वी तत्कालीन शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव appasaheb jadhav यांनी त्यांच्या कानसुलात लगावल्याचा दावा केला होता. तर त्याहीपुर्वी छत्रपती संभाजीनगरचे आ.संजय सिरसाठ sanjay sirsath यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलीसांकडून आ.सिरसाठ यांना क्लिनचीट देण्यात आली आहे. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली होती. नंतर ती छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा ठाण्यात वर्ग करण्यात आली होती.
आमदार संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी सिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगासह परळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये हे वक्तव्य करण्यात आल्याने बीड पोलिसांनी ही तक्रार छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडे वर्ग केली होती. त्यानंतर डीसीपी दर्जाच्या एका अधिकार्याकडून या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. मात्र संजय शिरसाट यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्यावेळी अंधारे या त्या ठिकाणी नव्हत्या. घटनास्थळी व्यक्ती नसल्याने विनयभंग होत नसल्याचा निकष पोलिसांकडून काढण्यात आला आहे. त्या प्रकरणी अंधारे यांना पत्र पाठवून पोलिसांकडून कळवण्यात देखील आले आहे.
सुषमा अंधारे यांच्यावर भाषणामध्ये अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु होता. यासाठी डीसीपी दर्जाच्या अधिकार्यासह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकार्यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली होती. तसेच यूट्यूबवर उपलब्ध असलेलं संजय सिरसाट यांचं भाषण तपासण्यात आले होते. तसेच तक्रारीमध्ये पुरवलेल्या भाषणाचीही तपासणी करण्यात आली. तर ‘लफडं’ हा शब्द कायद्याच्या चौकटीत बसतो का याचीही चौकशी करण्यात आली. तर विनयभंग करण्यात आल्याच्या आरोपाची देखील चौकशी करण्यात आली.
या आरोपाबद्दल बोलतान आ. संजय सिरसाट म्हणाले, मी असले कोणतेही वक्तव्य केले नव्हते. पण एखाद्या गोष्टीचे बाऊ करणे आणि बदनाम करण्याचा हा प्रकार होता. अंधारे कोर्टात देखील गेल्या होत्या आणि त्यांना न्यायालयाने देखील फटकारले आहे. त्यामुळे एखाद्या माणसाला टार्गेट करून स्वतः प्रसिद्धीत येण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. मी न्यायालयात गेलो नव्हतो, ते गेले होते. पण न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. तसेच जी काही कायदेशीर लढाई लढाईची आहे ती लढणार असल्याचे देखील सिरसाट म्हणाले.
What's Your Reaction?