चिंतेश्वर विद्यालयाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम
गेवराई प्रतिनिधी :- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आंबेजोगाई , संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने प्लास्टिक मुक्ती दिनानिमित्त गेवराई चे विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून साफ सफाई केली.
प्लास्टिक मुक्ती दिनानिमित्त श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांनी एक उत्स्फूर्त उपक्रम हाती घेऊन गेवराईची सफाई केली. यामध्ये भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री हेमंजीवैद्य सर त्याचप्रमाणे स्थानिक नियामक मंडळाचे कार्यवाह दत्ताजी पत्की स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद जी कुलकर्णी शालेय समिती अध्यक्षजी कुलकर्णी मुख्याध्यापक श्रीमती मोरगावकर व माध्यमिक मुख्याध्यापक श्री गोरकर यांच्या मार्गदर्शनाने चिंतेश्वर विद्यालयाने गेवराईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या साह्याने सफाई केली , यामध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत सर्व विद्यार्थी सहभागी असून सर्व शिक्षक वृंद देखील सहभागी होते .
What's Your Reaction?