जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडून मतपेटी व यंत्रणाची तपासणी संपन्न

बीड( प्रतिनिधी) :आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने बीड जिल्ह्यास भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड तथा बी इ एल कंपनीकडून मिळालेल्या मतपेटी आणि मतदान यंत्राची दैनंदिन तपासणी दिनांक ४ जुलै 2023 ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी मुक्त पत्रकार डॉ संजय तांदळे यांच्याशी संवाद साधताना दिली. मतपेटी व मतदान यंत्र एमआयडीसी भागातील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये सुरक्षा कक्षात ठेवण्यात आल्या होत्या. येथे कडक पोलीस बंदोबस्त तसेच आरोग्य पथक व अग्निशामक दल देखील ठेवण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या मशीनच्या प्रथम स्तरित तपासणीसाठी बी ई एल कंपनी कडून दहा अभियंतीची नियुक्ती करण्यात आली होती. या अभियंत्याकडून बी यु 60 85,सी यु 34 56, व्हीव्हीपॅट 37 31 ची तपासणी करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनच्या प्रथम स्तरीय तपासणी साठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे या वखार महामंडळाच्या गोदामास दररोज भेट देत कामाचा दैनंदिन आढावा घेत होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी साहेब तसेच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार तथा नायब तहसीलदार नित्यदिनी मशीन तपासणीसाठी काम पाहत होते. ईव्हीएम मशीनच्या प्रथम स्तरीय तपासणी च्या वेळी राजकीय पक्षांच्या काही प्रतिनिधींनी व पत्रकारानी येथे भेट दिल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली .
What's Your Reaction?






