जिल्हाधिकारी मुंडे यांनी पिंपरगव्हाण येथे विकास कामांचा आढावा घेतला
बीड तालुक्यातील पिंपरगव्हान येथे जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी विविध विकास कामांची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.
आज पिंपरगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत चाललेल्या विविध विकास कामाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार जीवने ,गटविकास अधिकारी सानप यांनी गावात झालेले विकास कामाची पाहणी करून गावकऱ्यांची विविध अडचणी बाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला त्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या
यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने जिल्हाधिकारी मुंडे यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर सरपंच ग्रामसेवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?