पाणी-प्रश्नावर-जिल्हाधिकारी-यांची-आढावा-बैठक-संपन्न
पाणी बाबत सर्वसामान्यांच्या मागणीवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ आढावा बैठक घेऊन जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना.
जुनचा महिना सुरू असुन ऊन्हाचा पारा ४३ वर जात आहे, अश्या परिस्थितीत सुद्धा बीड नगरपरिषद २० विस दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत नाही, प्रतिनिधीनी नगरपरिषदे कळे तक्रार किंवा मागणी केली की नगरपरिषद एम.जे.पी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नावाने आरडाओरडा करत असते प्रत्येक वेळी असेच होत आहेत म्हणून काल सकाळी मा. सभापती खुर्शीद आलम, नगरसेवक गुंजाळ, अमोल पउड व इतर नागरिकांसह कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मॅडम ची भेट घेऊन पाणी प्रश्नी तक्रार केली की लगेच जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मॅडम यांनी त्यांच्या सोबत असलेल्या मुख्याधिकारी अंधारे मॅडम आणि एम.जे.पी.चे वाघ साहेबांना कलेक्टर ऑफिस मध्ये सहा वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले आणि शिष्टमंडळाला सांगितले की सहा वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी आळावा बैठक घेणार आहे तिथे या असे सांगितले, सहा वाजता पाणी आळावा बैठकीत मुख्याधिकारी अंधारे मॅडम आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी आणि एम.जे.पी.चे वाघ साहेब आणि अधिकारी उपस्थित होते यावेळी खुर्शीद आलम यांनी आपल्या प्रस्ताविक सविस्तर तक्रार मध्ये म्हटले की अटल अमृतजल योजनेतील पाइपलाइन पुर्ण झाले नाही,
मंजूर नकाशात दाखवल्याप्रमाणे पाइपलाइन टाकण्यात आली नाही, काही ठिकाणी तर जुन्याच पाइपलाइन मध्ये नविन पाइपलाइन जोडण्यात आली, नकाशात मंजूर असलेल्या गल्ली दोनशे फुटांची असताना शंभरच पाइपलाइन टाकण्यात आली आहे, एम.जे.पी. आणि नगरपरिषद मध्ये ताळमेळ नाही म्हणून अटल अमृतजल योजनेतील कामे पूर्ण झाली नाही आणि त्यामुळेच बीड शहरात विस विस दिवस पिण्याचे पाणी येत नाहीत याला जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकार्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई कारेवाई करावी मागणी खुर्शीद आलम यांनी केली, तर एम.एस.इ.बी. महामंडळाने पाणीपुरवठा ची लाईट कट किंवा बंद करू नय अशी मागणी नगरसेवक बाबु मुळुक यांनी केली, विस विस लोकांना पाणी नाही लोंका आमच्या अंगावर येत आहे पाणी सुरळीत द्या आणि टैंकर वाढवून द्यावे अशी मागणी केली, नगरसेवक बनसोडे यांनी अनेक मुद्दे मांडले आहे, या नंतर जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मॅडम यांनी तक्रारी आणि नकाशा आणि स्वतः बारकाईने अभ्यास पुर्वक चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत चालू करा असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मॅडम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, यावेळी नगरसेवक प्रभाकर पोफळे,अमोल पउड, शेशेराव तांबे, अमोल आहीरे,जानी भाई,शेख अझहर, दत्ता जाधव, रेहाना पठाण,हमीद पठाण,मोमीन शहेबाज, आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?