धनगर आरक्षणासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना समाजाने दिले निवेदन
बीड प्रतिनिधी:- धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी मा.ना.रामदासजी आठवले साहेब समाज कल्याण केंद्रीयमंत्री भारत सरकार यांना धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणसाठी आज बीड येथे माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब समाज कल्याण केंद्रीयमंत्री भारत सरकार यांना धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यात आले यावेळी धनगर समाजाचे नेते प्रकाश भैय्या सोनसळे यांच्यासह समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले .
गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत धनगर समाजाला राज्यघटनेत देण्यात आलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून वेळोवेळी उपोषण केले आंदोलन केले ,रास्ता रोको केला सरकारचा निषेध केला यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातला धनगर समाज अनेक दिवसापासून स्वतःच्या आरक्षणासाठी झगडत आहे.
मा.ना.रामदास आठवले साहेब साहेब या समाजाची एक मागणी आहे धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आपण मोदी सरकार मधील मंत्री महोदयांना कळवून आदी धनगर आरक्षणाची बैठक लावून या धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाची भावना आहे अनेक वर्षापासून धनगर एसटी आरक्षणासाठी हा समाज लढत आहे धनगर एसटी आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही आपणास हे निवेदन देत आहोत
यावेळी संपत करे,भरत गाडे ,विलास महानवर ,श्याम गाडेकर, अमोल भोंडवे, नारायण भोंडवे सुदर्शन भोंडवे आदी समाज बांधव उपस्थित होते
What's Your Reaction?