पूजा खेडकर विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटनेची दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार

पूजा खेडकर विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटनेची दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार

बीड प्रतिनिधी: दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी पुजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांची राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे

भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू होण्याकरिता कठोर तपश्चर्या करून अनेक दिव्यांग युवक - युवती संवैधानिक मार्गाने प्रयत्नशील राहुन यशस्वी होतात. हे जरी खरे असले तरी सन 2023 मधे श्रीमती पुजा खेडकर या भारतीय प्रशासन सेवेतील तुकडीच्या उमेदवार म्हणून नावारूपाला आल्या व सन 2023 पुर्वी पुजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातुन सन 2018 व सन 2021 या कालावधीत दोन वेळा अशे एकुण 3 वेळा दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोगाला सुपुर्द केले. परंतु आयोगाला दाखल झालेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र आयोगाने अवलोकन केले असता श्रीमती पुजा खेडकर यांचे बहुविकलांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचे आयोगास अवगत झाले. म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाने श्रीमती पुजा खेडकर यांना आयोगाच्या नियमास व धेय्य धोरणास अनुसरून वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले होते.

परंतु श्रीमती पुजा खेडकर यांनी एकुण 6 वेळा वैद्यकीय तपासणीस वारंवार नकार देवुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आदेशाचे अनुपालन केले नाहीच उलट खाजगी वैद्यकीय प्राधिकारणातील तपासणी अहवाल आयोगास दाखल केला.जे की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमाविरुद्ध व धेय्य धोरणाविरुद्ध आहे. हे वृत्त प्रसारमाध्यमातुन शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या निदर्शनास येताच संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्त श्री.प्रविन पुरी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे थेट ई-मेलद्वारे व व्हॉट्सॲप द्वारे लेखी तक्रार करून श्रीमती पुजा खेडकर यांचे संशयास्पद असलेले दिव्यांगत्व व दिव्यांगत्व प्रमाणपत्र उच्चस्तरीय वैद्यकीय प्राधिकारणास तपासण्याचे आदेश निर्गमित करावेत अशी तक्रारीत मागणी केली आहे. व या तक्रारीची प्रत सचिव प्रशिक्षण व कार्मिक विभाग नवी दिल्ली भारत सरकार, मुख्य सचिव श्रीमती. सुजाता सौनिक महाराष्ट्र राज्य मुंबई, अप्पर मुख्य सचिव श्रीयुत.नितिनजी गद्रे महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी पुणे व प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असलेल्या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय यांना देवुन उचित कठोर कार्यवाहीची मागणी तक्रारीत केली आहे. अशी माहिती शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी दिव्यांग व्यक्तींच्या हितार्थ प्रसिद्धीपत्रकान्वय कळवली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow