राष्ट्रीय महामार्गाला पुरुषोत्तमपुरीचा मार्ग जोडा! सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे
भारत देशात एकमेव असे भगवान पुरुषोत्तमाचे ( विष्णूचे )मंदिर बीड जिल्हा तील माजलगाव तालुक्यात असून माजलगाव पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे .सध्या दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास चा महिना( धोंड्याचा महिना) चालू असून देशभरातून विविध राज्यातून नित्य दिनी एक लाखाच्या वर भाविक भक्त भगवान पुरुषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.त्यांना रस्ता ,पाणी, लाईट, पार्किंग अशा समस्यांना सामना करावा लागत आहे. भक्तांना पार्किंग स्थळापासून चार किलोमीटर पायी चालत जावं लागत आहे.माजलगाव पुरुषोत्तम पुरी ला जाण्यासाठी सादोळा व सावरगाव या दोन मार्गाने जाता येत असून दोन्ही मार्गाचा पाच-सहा किलोमीटर चा रस्ता खराब झालेला असून या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत.या अपघातात अनेक भक्त जखमी झालेले आहेत.सदरील रस्ता दुरुस्त करण्याबाबत स्थानिक नागरिकाची तसेच भाविक भक्तांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे.तरी देखील लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत .खामगाव पंढरपूर हा महामार्ग पुरुषोत्तम पुरी च्या जवळून जात असून या राष्ट्रीय महामार्गाला पुरुषोत्तम पुरी चा मार्ग जोडण्यात यावा अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना तर स्थानिक रस्त्या दुरुस्त करणे बाबत व पार्किंग स्थळापासून मंदिरापर्यंत चार किलोमीटरचा रस्ता दुहेरी करणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्फत बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने पाठवलेल्या निवेदनाद्वारे डॉ संजय तांदळे, सुदाम कोळेकर , पांडुरंग आंधळे , आदींनी केली आहे.
What's Your Reaction?