बीड जिल्ह्यात मिरचीच्या शेतात आढळली गांजाची झाडे
केज तालुक्यातील चिंचपूर येथे चक्क मिरचीच्या शेतामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी जाऊन पंचा समक्ष कारवाई केली आहे .या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली.
युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या केज तालुक्यातील चिंचपूर येथे, काल दिनांक सात जून रोजी शेतकरी सतपाल ग्यानबा घुगे हा स्वतःच्या फायद्यासाठी सक्त मनाई असताना स्वतःच्या मिरचीच्या शेतामध्ये, चक्क गांजाच्या झाडांची लागवड केली. आणि त्याची चोरटी विक्री करत होता. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. यावेळी त्यांनी त्यांच्या पथकासमवेत सापळा रचून युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील चिंचपूर येथील शेत शिवार गाठून त्या गांजाच्या झाडावर छापा टाकला. यामध्ये साडेसहा ते सात फुटाचे नऊ हिरवेगार झाडे आढळली. एकूण 24 किलो 830 ग्रॅम माल आढळून आला.अंदाजे एक लाख 24 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. यावेळी याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या फिर्यादीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या उपस्थितीत ,सपोनी योगेश उबाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली आहे .याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
What's Your Reaction?