मोहम्मद पैगंबरावर आक्षेपार्ह करणाऱ्या वर कारवाईची मागणी

मोहम्मद पैगंबरावर आक्षेपार्ह करणाऱ्या वर कारवाईची मागणी

बीड (प्रतिनिधी) - मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अत्यंत लज्जास्पद व आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर टाकणाऱ्या गणराज नाईक याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी एआयएमआयएमचे शेख नेहाल अहेमद यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात असलेल्या मौजे पाडुळी नाईक येथील गणराज नाईक या माथेफिरू ने इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अत्यंत हिन, लज्जास्पद व आक्षेपार्ह विधान सोशल मीडिया वरून प्रसारित केल्याबद्दल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. प्रसंगी त्याला राज्यातून हद्दपार करायला हवे. ज्यामुळे यापुढे कोणीही इतर धर्म व त्या-त्या धर्मातील साधूसंत, प्रेषित यांच्या विषयी अनादर करून कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करू नये याची दखल घेणे आवश्यक आहे. मंत्री महोदय आपण जाणतच आहात की नुकतेच मुहम्मद पैगंबर यांची ईद-ए-मिलादुन्नबी व गणपती विसर्जन मुस्लिम व हिंदू समाजाने गुण्यागोविंदाने एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करत साजरे केले. एवढेच नाही तर २८ सप्टेंबर रोजी आलेली ईद-ए-मिलादुन्नबी हिंदू बांधव व शासन-प्रशासनाच्या आग्रहाखातर २८ ऐवजी कुठे २९ तर कुठे ३० सप्टेंबरला अशाप्रकारे एक किंवा दोन दिवस पुढे ढकलून राज्यभरात साजरी करण्यात आली. हिंदू मुस्लिम समाजबांधव अशाप्रकारे एक दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करत गुण्यागोविंदात राहत असताना हा गणराज नाईक नावाचा माथेफिरू पाडूळी नाईक येथून उठतो आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अशा माथेफिरूवर शासन-प्रशासनाकडून कडक कारवाई करून भारतीय दंड विधान क्रमांक १५३ व ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व कडक शासन करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे एआयएमआयएम चे निहाल अहेमद यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow