लोकशाही हा शाश्वत विचार! प्रा. बाळासाहेब मस्के
शिरूर कासार (प्रतिनिधी) शिक्षणाने माणसाला माणूस पण येते. शिक्षणाशिवाय आपणास समाजामध्ये कसे वागावे हे कळत नाही. त्यासाठी आपणास शिक्षण खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासनशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक लोकशाही दिनानिमित्त आयोजित व्याख्याना प्रसंगी प्रा. बाळासाहेब मस्के यांनी केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे हे होते तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय तुपे लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्ताविका वाचनाने झाली.
पुढे बोलताना प्रा. मस्के म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतदान करताना डोके ठिकाणावर ठेवून करावे आपण कोणत्या प्रतिनिधीला निवडून देत आहोत याचे भान आपणास असले पाहिजे. लोकशाही पुढील आव्हाने सांगत असताना त्यांनी लोकशाहीतील विविध शाहीची माहिती दिली. त्यामध्ये नोकरशाही, गुंडशाही याचाही उल्लेख त्यांनी केला. त्याचबरोब कट्टर भाषावाद, कट्टर धर्मवाद हे सुद्धा लोकशाहीला मारक आहेत असेही ते म्हणाले लोकशाहीमध्ये भीती दाखवून तिला दिशाहीन केले जाते. येणाऱ्या पिढीने अशा आव्हानांना ओळखून लोकशाही कशी टिकवली जाईल याकडे लक्ष द्यावे असा सल्ला ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे म्हणाले की, ग्रामीण भागात लोकशाही रुजली पाहिजे लोकशाहीचे मूल्य ग्रामीण भागात जोपासले पाहिजे लोकशाही पुढील आव्हाने व दिशा अशा विषयावर मांडणी करताना प्रा. बाळासाहेब मस्के यांनी लोकशाहीचे खरे वास्तव चित्रण आपल्या व्याख्यानात सांगितले अशा व्याख्यानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लोकशाही म्हणजे काय? लोकशाहीचे मूल्य कोणते आहेत आणि लोकशाहीचे मूल्य कसे जोपासावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागतिक लोकशाही दिनानिमित्त महाविद्यालयात अशा व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते असेही ते म्हणाले .याप्रसंगी लोकप्रशासन विभागाचे "प्रशासननामा" आहे भित्तिपत्रक प्रकाशित करण्यात आले.याप्रसंगी अश्विनी गिह्रे, सानिका भारती, आंचल इत्यादी संपादकीय मंडळ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. टी पवार यांनी केले प्रमुख पाहुण्याचा परिचय डॉ.नवनाथ पवळे यांनी करून दिला. उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. रमेश लांडगे यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?