चकलांबा पोलिसांचे गणेशोत्सवानिमित्त पथ संचालन व दंगा काबू योजना प्रात्यक्षिक संपन्न
बीड प्रतिनिधी:- चकलांबा पोलीस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्र उमापूर येथे गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद अनुषंगाने उमापूर गावात पथ संचलन व दंगा काबू योजना प्रात्यक्षिक कवायत घेण्याबाबत माननीय पोलीस औरंगाबाद परिक्षेत्र यांनी सुचित केल्याने मा पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर साहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब बीड तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नीरज राजगुरू गेवराई उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आली.
पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर इंगळे व पोलीस स्टेशन कडील 20 कर्मचारी व 12 होमगार्ड्स 30 ते 35 नागरिकांनी भाग घेतला होता. सदर कारवाई मध्ये ज्यावेळी दंगा सदृश परिस्थिती निर्माण होते त्यावेळी पोलिसांचे वर्तन कसे असावे, लाठी चार्ज कसा केला पाहिजे, त्यानंतर अश्रू धुरांचे नळकांडे कशा पद्धतीने फोडले पाहिजे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
प्रात्यक्षिक संपल्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांनी गणपती उत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या अनुषंगाने चकलांबा पोलीस ठाण्यात या हद्दीतील लोकांना सण-उत्सव हे शांततेत पार पाडण्याचे तसेच धर्माधर्मांमध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण न करता एकोप्याने सण साजरे करण्याचे, समाज माध्यमांवरती व्हायरल होणाऱ्या अक्षपाहऱ्य पोस्ट वरती लगेच रिऍक्ट न होता सदरची पोस्ट ही व्हायरल न करण्याबाबत तसेच डिलीट करण्याबाबत मार्गदर्शन केले जेणेकरून समाजा समाजामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण होऊन अनुचित प्रकार घडणार नाही. असे आवाहन केले.
What's Your Reaction?