उप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रासपा कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी:- राष्ट्रीय समाज पक्षाने मुंबई येथे उभारलेल्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मंत्री दीपकजी केसरकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर साहेब, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, ज्ञानेश्वर सलगर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बीड येथील जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर विधानसभा अध्यक्ष माऊली मार्कड गेवराई युवक तालुका अध्यक्ष कृष्णा धापसे व इतर सर्व महाराष्ट्रातील प्रदेश बॉडी विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व बहुसंख्येने उपस्थित होते अतिशय आनंदात आणि उत्साहात हे उद्घाटन पार पडले
What's Your Reaction?






