माझ्यासाठी दिल्ली आणखी दूर आहे म्हणून धनंजय मुंडेंचा लोकसभेसाठी नकार!
माझ्यासाठी दिल्ली आणखी दूर आहे म्हणून धनंजय मुंडेंचा लोकसभेसाठी नकार!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य हा येत्या 10 जून रोजी २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पार्श्व भूमीचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या ९ जून २०२३ रोजी पक्षाची अहमदनगर येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी आज दि. २९ मे २०२३ रोजी बीड येथे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीत बीड जिल्ह्यातील सर्व मतदार संघातून पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, पक्षाच्या विचाराला मानणारे सर्व नागरिक अशा सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचा सभेसाठी अहमदनगर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
आगामी काळातल्या निवडणुकांच्या व राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या अहमदनगर जिल्ह्यातील सभेला अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यातून देखील हजारो नागरिक संमिलीत व्हावेत, यासाठी याचे पूर्व नियोजन करण्यासाठी आज या पूर्व आढावा बैठकीचे आयोजन बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीस माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. धनंजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.अमरसिंह पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.संजय भाऊ दौंड, विजयसिंह पंडित यांचासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभेत बीड मतदार संघ राष्ट्रवादीकडे जाणार का?
काही वर्षांपूर्वी १९९९ ते २००९ या काळात बीड मतदार संघ हा राष्ट्रवादीकडे होता. यावेळी गायकवाड हे खासदार होते. त्यानंतर हा मतदार संघ भाजपकडे गेला आणि सध्या डॉ. प्रीतमताई गोपीनाथ मुंडे या बीडच्या खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक मध्ये बीड जिल्हा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आपले वर्चस्व स्थापन करू शकतील का? असा प्रश्न सर्व बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
What's Your Reaction?